स्वतःविषयी


नमस्कार. ..

मी मधुकर माळी 

जि.प.प्राथमिक शाळा,आलेगाव.ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर या शाळेत विषय शिक्षक.वीडियो निर्मिती ,pdf निर्मिती,ब्लॉग निर्मिती केली असून संपुर्ण महाराष्ट्रात online मार्गदर्शन."महाराष्ट्र ई -लर्निंग"राज्यस्तर शैक्षणिक whats app समूहाची निर्मिती केली असून 35 जिल्ह्यातील शिक्षक आणि एजुकेशनल ऑफिसर्स "महाराष्ट्र ई -लर्निंग"समूहात कार्यरत आहेत. 
संपूर्ण महाराष्ट्रात 35 mel ची निर्मिती केली असून महाराष्ट्रातील 8 हजार शिक्षक समूहात कार्यरत आहेत .
महाराष्ट्रातील शिक्षकांना mel ने नाविन्य पूर्ण व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे .
महाराष्ट्रातील एक ही शाळा ई -लर्निंग पासून वंचित राहू नये,यासाठी स्मार्ट - लर्निंग ,ई -लर्निंग व टेबल tv - लर्निंग हे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केले .या उपक्रमास महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .
मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी इयत्ता 1 ते  8 वी पर्यंतचे सर्व वीडियोज ,pdf व पाठ्यपुस्तके "महाराष्ट्र ई -लर्निंग"समूहाच्या व ब्लॉगच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन दिली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हावार एक असे 35 mel ग्रुप तयार केले .महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना एकत्रित आणून सर्व प्रकारचे online मार्गदर्शन होत आहे .हे सर्व मार्गदर्शन शाळेच्या वेळेव्यतिरिक्त केले जाते .
या 35 mel ग्रुपचे अनावरण दि.9/8/2016 रोजी 6:00 pm वाजता महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव शालेय शिक्षण ,प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय नंदकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते "महाराष्ट्र ई -लर्निंग"ग्रुपवर online अनावरण झाले.
माझ्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय क्षण.

2 comments:

  1. अप्रतिम ब्लॉग

    ReplyDelete
  2. माळी कार्य अप्रतिम उत्कृष्ट

    ReplyDelete