Tuesday, 31 December 2024


 ।।Happy New Year- 2025॥ जुन्या वर्षांचा शेवट हा केवळ एका कॅलेंडरच्या पानांचा बदल नसतो ,तो आपल्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो.या शेवटी आपण आपले यश ,आपले अपयश ,आपल्या आठवणी ,आपली शिकवण आणि अनुभव यांचा विचार करतो.

"गेलं वर्ष शिकवून गेलं,नव्या सुरुवातीची दिशा दाखवून गेल.आता नवीन स्वप्नांसाठी पुढे जा,आणि जुन्या आठवणींना मनाच्या अनमोल कप्प्यात जपून ठेवा!"

Monday, 30 December 2024

  ॥॥॥अलविदा  २०२४॥॥॥ Bye Bye 2024 ॥॥॥वरील  TV  च्या  प्ले  बटणावर क्लिक करा ॥॥॥अलविदा  २०२४॥॥॥ Bye Bye 2024 ॥॥॥

॥॥॥अलविदा  २०१४॥॥॥ Bye Bye 2024 ॥॥॥

Saturday, 28 December 2024

🎯शिक्षण परिषद केंद्र कर्जाळ बीट - मेंदर्गी माहे -डिसेंबर २०२४ कर्जाळ केंद्रांमधील सर्व जिल्हा परिषद शाळां, खाजगी अनुदानित शाळां,आश्रम शाळां येथील मुख्याध्यापक व इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणारे सर्व शिक्षक यांना कळविण्यात येते की शुक्रवार दिनांक २७/१२/ २०२४ रोजी कर्जाळ केंद्राची माहे- डिसेंबर २०२४ ची शिक्षण परिषद जि.प. प्रा शाळा हसापुर येथे संपन्न झाली. केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु भगिनीं आणि केंद्रप्रमुख ,विषय तज्ञ यांनी 1:00 ते 2:00 या वेळेत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. दु २.००ते ५.०० या वेळेमध्ये आपली शिक्षण परिषद आनंदी वातावरणात संपन्न झाली. 🏀 स्थळ :- जि प प्रा शाळा हसापूर ..... विषय पत्रिका 🔴१)स्वागत व परिपाठ - (सूत्रसंचालन) -श्री सौदागर कांबळे सरांनी खूप खूप सुंदर सूत्रसंचालन करून सर्व शिक्षकांची मने जिंकली. 🔴 2)प्रास्ताविक - श्री.मधुकर माळी सर मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा हसापूर यांनी शाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन शाळा डिजिटल आणि ई लर्निंग करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी व ग्रामस्तांनी केलेले सहकार्य हे अतिशय अनमोल असून शाळेसाठी महत्वपूर्ण योगदान ठरले.मुख्याध्यापकानी सर्वांचे आभार मानले. 🔴 3) रंगोत्सव व समृद्धी- श्री समीर कुलकर्णी सरांनी खूप सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. 🔴 ३)शाळा सिद्धी/online शिक्षक प्रशिक्षण आढावा दीक्षा ॲप द्वारे- श्री अरविंद शेळके सरांनी सर्वांना समजेल अशा भाषेत शाळा सिद्धी/online शिक्षक प्रशिक्षण आढावा दीक्षा ॲप द्वारे मार्गदर्शन केले. 🔴 ४) हॅकथान स्पर्धा/ चॅट बोट वर चाचणीच्या निकालाची माहिती भरणे, प्रशासकीय सूचना - केंद्रप्रमुख श्री.जीवराज खोबरे सरांनी प्रशासकीय माहिती अगदी सोप्या भाषेत अपार आयडी ,यु-डायस प्लस ,ड्रॉप बॉक्स मधील विदयार्थी '0' करणे या विषयी सर्व शिक्षकांना समजेल असे मार्गदर्शन केले. 🔴 ५) निपूणोत्सव अंमलबजावणी या विषयी श्रीम.राजश्री झिंगाडे मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केले. 🎯 बसवराज गुरव सरांनी शालेय पोषण आहार विषयी अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. 🎯 👉अपार आयडी ,यु-डायस प्लस ,ड्रॉप बॉक्स, प्रशासकीय विषय - या विषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती विषय तज्ञ श्री.गणेश अंबुरे सर यांनी दिली. 👉👉 सदरील शिक्षण परिषदेस मार्गदर्शन करणाऱ्या सर्व तज्ञ मार्गदर्शकांचे आणि हसापूर शाळेने जेवण अतिशय उत्कृष्ट केल्याने हसापूर शाळेतील सर्व शिक्षकांचे सत्कार करून कार्यक्रमाची सांगता गोड केली. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शिक्षण परिषद फोटो पाहण्यासाठी क्लिक करा ➡DOWNLOAD