Pages
- Home
 - व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सहावी
 - व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-सातवी
 - व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पाचवी
 - व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-चौथी
 - व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-तिसरी
 - व्हिडिओ & पाठ्यपुस्तके-दुसरी
 - स्वतःविषयी
 - व्हिडिओंची महालिंक
 - ZPPS Aalegaon
 - 13 शैक्षणिक apps
 - ऑनलाईन मार्गदर्शन
 - ऑनलाईन टेस्ट
 - Mel Live TV
 - 85 स्वः निर्मित शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स - श्री.मधुकर माळी.
 - महाराष्ट्र ई लर्निंग ब्लॉग
 - इमेज
 - व्हिडिओ&पाठ्यपुस्तके-पहिली
 
Saturday, 28 December 2024
  
  
    🎯शिक्षण परिषद केंद्र कर्जाळ बीट - मेंदर्गी माहे -डिसेंबर २०२४ कर्जाळ
    केंद्रांमधील सर्व जिल्हा परिषद शाळां, खाजगी अनुदानित शाळां,आश्रम शाळां येथील
    मुख्याध्यापक व इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणारे सर्व शिक्षक यांना कळविण्यात
    येते की शुक्रवार दिनांक २७/१२/ २०२४ रोजी कर्जाळ केंद्राची माहे- डिसेंबर २०२४
    ची शिक्षण परिषद जि.प. प्रा शाळा हसापुर येथे संपन्न झाली. केंद्रातील सर्व
    मुख्याध्यापक व शिक्षक बंधु भगिनीं आणि केंद्रप्रमुख ,विषय तज्ञ यांनी 1:00 ते
    2:00 या वेळेत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. दु २.००ते ५.०० या वेळेमध्ये आपली
    शिक्षण परिषद आनंदी वातावरणात संपन्न झाली. 🏀 स्थळ :- जि प प्रा शाळा हसापूर
    ..... विषय पत्रिका 🔴१)स्वागत व परिपाठ - (सूत्रसंचालन) -श्री सौदागर कांबळे
    सरांनी खूप खूप सुंदर सूत्रसंचालन करून सर्व शिक्षकांची मने जिंकली. 🔴
    2)प्रास्ताविक - श्री.मधुकर माळी सर मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा हसापूर
    यांनी शाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन शाळा डिजिटल आणि ई लर्निंग
    करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी व ग्रामस्तांनी केलेले सहकार्य हे अतिशय अनमोल
    असून शाळेसाठी महत्वपूर्ण योगदान ठरले.मुख्याध्यापकानी सर्वांचे आभार मानले. 🔴
    3) रंगोत्सव व समृद्धी- श्री समीर कुलकर्णी सरांनी खूप सोप्या भाषेत मार्गदर्शन
    केले. 🔴 ३)शाळा सिद्धी/online शिक्षक प्रशिक्षण आढावा दीक्षा ॲप द्वारे- श्री
    अरविंद शेळके सरांनी सर्वांना समजेल अशा भाषेत शाळा सिद्धी/online शिक्षक
    प्रशिक्षण आढावा दीक्षा ॲप द्वारे मार्गदर्शन केले. 🔴 ४) हॅकथान स्पर्धा/ चॅट
    बोट वर चाचणीच्या निकालाची माहिती भरणे, प्रशासकीय सूचना - केंद्रप्रमुख
    श्री.जीवराज खोबरे सरांनी प्रशासकीय माहिती अगदी सोप्या भाषेत अपार आयडी
    ,यु-डायस प्लस ,ड्रॉप बॉक्स मधील विदयार्थी '0' करणे या विषयी सर्व शिक्षकांना
    समजेल असे मार्गदर्शन केले. 🔴 ५) निपूणोत्सव अंमलबजावणी या विषयी
    श्रीम.राजश्री झिंगाडे मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केले. 🎯 बसवराज गुरव
    सरांनी शालेय पोषण आहार विषयी अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. 🎯 👉अपार
    आयडी ,यु-डायस प्लस ,ड्रॉप बॉक्स, प्रशासकीय विषय - या विषयी अतिशय महत्वपूर्ण
    माहिती विषय तज्ञ श्री.गणेश अंबुरे सर यांनी दिली. 👉👉 सदरील शिक्षण परिषदेस
    मार्गदर्शन करणाऱ्या सर्व तज्ञ मार्गदर्शकांचे आणि हसापूर शाळेने जेवण अतिशय
    उत्कृष्ट केल्याने हसापूर शाळेतील सर्व शिक्षकांचे सत्कार करून कार्यक्रमाची
    सांगता गोड केली. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शिक्षण परिषद फोटो पाहण्यासाठी क्लिक करा ➡DOWNLOAD
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment